बेबीस वर्ल्ड अन किड्स वर्ल्डच्या माध्यमातून अनोखा उपक्रम

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त चिमुकल्यांना खाऊ व भेटवस्तूंचे वाटप

⚡सावंतवाडी ता.१६-: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेबीस वर्ल्ड अन किड्स वर्ल्डच्या माध्यमातून अनोखा उपक्रम काल राबविण्यात आला. किड्स वर्ल्डच्या माध्यमातून आजादी का अमृत महोत्सवानिमित्त चिमुकल्यांना खाऊ व भेटवस्तूंच वाटप करण्यात आले.

सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, बेबीस वर्ल्ड, किड्स वर्ल्डचे अभिषेक राऊळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, बेबीस वर्ल्ड, किड्स वर्ल्डचे अभिषेक राऊळ आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page