सुभाष पुराणिक , विनोद बेलवाडकर यांनी केले मार्गदर्शन
⚡कणकवली ता.१४-: माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेना विभाग, सामाजिक वनिकरन विभाग सिंधुदुर्ग व सामाजिक वनिकरन विभाग कणकवली यांच्यावतीने बिडवाडी हायस्कुल मध्ये वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमामध्ये विभागीय वनअधिकारी सुभाष पुराणिक , वनक्षेत्रपाल विनोद बेलवाडकर – यांनी प्रशालेच्या आवारामध्ये वृक्षलागवड करून कार्यक्रमाची सुरुवात केली, त्यानंतर विद्यार्थिनींनी झाडाला पर्यावरण प्रेमी राखी बांधली व पर्यावरण शपथ घेण्यात आली. सुभाष पुराणिक यांनी वनस्पती आपल्याला कशा उपयुक्त आहेत यांविषयी उदाहरणांसहित माहिती दिली. प्रशालेचे प्राचार्य श्री. एस. डी. जोशी यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. ए.एस. सावंत यांनी केले,तर आभार ए. के. कांबळे यांनी मानले. सदर कार्यक्रमप्रसंगी वनपाल श्री. जंगले व श्री. इंदुलकर , श्री. टी. ए. कुबल, श्री. एस. डी. रासम. डी. आर.गोसावी, आर. बी. पाटणकर, एम. डी. झळके. प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
