मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला

कणकवलीत मराठा समाजातर्फे शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना श्रद्धांजली

⚡कणकवली ता.१४-; शिवसंग्रामचे अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले,ही वेदनादायी बातमी आहे.माजी आमदार विनायक मेटे हे महाराष्ट्रातील मराठा समाजाचा बुलंद आवाज होता. मराठा समाजाची चळवळ मजबूत करण्यासाठी गेली अनेक वर्ष विनायक मेटे काम करत होते. मराठा समाजावरील होणारा अन्याय आणि आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी लढा दिला होता. त्यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला. मराठा समाजाचा बुलंद आवाज आपला हरपला अशा शब्दांत कणकवलीत मराठा समाज कार्यकर्त्यांनी दिवंगत विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी मराठा समाजाचे नेते लवु वारंग,एस.टी.सावंत,एस.एल.सपकाळ ,सुशिल सावंत,आर.जी.सावंत,निळकंठ वारंग,समीर सावंत,अविनाश राणे,सागर वारंग,गजानन राणे आदींसह मराठा समाज कार्येकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page