ओरोस ता.१३-:
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात येत असलेल्या स्वराज्य महोत्सव उपक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा १२ ऑगस्ट रोजी पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेली ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
चित्रकला स्पर्धेत ९३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. निबंध स्पर्धेत ९६ विद्यार्थ्यांनी तर वक्तृत्व स्पर्धेत ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी अशा चार गटात घेण्यात आली. विजयी स्पर्धकांचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकरी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, शिक्षणाधिकारी डॉ मुस्ताक शेख यांनी अभिनंदन केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे व सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.
चित्रकला स्पर्धेत पहिली ते चौथी गटात श्रावणी धुरी (आंबोली मुळवंद – सावंतवाडी), शिवम आमडोसकर (वागदे डगळवाडी – कणकवली), श्रेया राऊत (खारेपाटण हसोळटेंब – कणकवली) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. पाचवी ते सातवी गटात हर्षिता देवरुखकर (मिलाग्रिज हायस्कूल सावंतवाडी), कल्पक कोकरे (माध्यमिक विद्यामंदिर पडेल), अनुश्री राणे (एस एम हायस्कूल कणकवली) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. आठवी ते दहावी गटात ऋतुजा म्हाडगुत (राणी पार्वतीदेवी हायस्कूल सावंतवाडी), पार्थ मेस्त्री (भंडारी हायस्कूल मालवण), रिया कांबळे (माध्यमिक विद्यालय पडेल) यांना प्रथम तीन क्रमांक मिळाले. अकरावी ते बारावी गटात मिहिर कदम (जांभवडे हायस्कूल), आयुष पेडणेकर (ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट), मानसी करलकर (टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय मालवण) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविला.
निबंध स्पर्धेतील पहिली ते चौथी गटात भार्गवी आळवे (वराड देवूळवाडी, मालवण), विराज कोदले (साळशी नंबर १, सावंतवाडी), स्वरा बांदेकर (भंडारी प्राथमिक शाळा मालवण) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. पाचवी ते सातवी या दुसऱ्या गटात समीक्षा कुणकेरकर (कुणकेरी नंबर १, सावंतवाडी), रिया मेस्त्री कोटकामते नंबर १, देवगड), वैशाली गोवेकर (वजराट देवसू, वेंगुर्ले) यांनी पहिले तीन क्रमांक मिळविला. आठवी ते दहावी गटात प्रथम श्रेया शेळके (आचीर्णे हायस्कूल, वैभववाडी), द्वितीय चिन्मया ठाकूर (शेठ म ग हायस्कूल देवगड), तृतीय श्रावणी तेली (शिवडाव हायस्कूल कणकवली) हे विजेते ठरले. अकरावी ते बारावी या गटात प्रीती परब (ज्युनिअर कॉलेज कळसुली कणकवली), मानसी करलकर (टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय मालवण), संजना धुमक (वाडोस हायस्कूल कुडाळ) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले.
वक्तृत्व स्पर्धेतील पहिली ते चौथी गटात नील बांदेकर (बांदा नंबर १ सावंतवाडी), विराज पाटील (शिराळे नंबर १ वैभववाडी), संचीता पाटील (ओटव ओटववाडी कणकवली) यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविला. पाचवी ते सातवी गटात ध्रुवी भाट (वराडकर हायस्कूल कट्टा, मालवण), सुखद फडके (कवठी नंबर १ कुडाळ), साक्षी दळवी (वजराट नंबर १ वेंगुर्ले) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. आठवी ते दहावी गटात खुशी गावणेर (माध्यमिक विद्यालय हेत वैभववाडी), सौम्या मणेरकर (न्यू इंग्लिश स्कूल भेडशी दोडामार्ग), चंदना पावसकर (चेंदवण हायस्कूल कुडाळ) हे प्रथम तीन क्रमांकाचे विजेते ठरले. अकरावी ते बारावी गटात श्रद्धा मडव (जांभवडे हायस्कूल कुडाळ), भक्ती पाटील (कै हेमंत केशव रावराणे ज्युनिअर कॉलेज वैभववाडी), हिंदवी गांवकर (ज्युनिअर कॉलेज कनेडी कणकवली) हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाने विजेते ठरले आहेत.
