शासन विभागांचे संयुक्त आयोजन
देवगड
देवगड स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त कृषी विभाग , कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) पंचायत समिती देवगड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान देवगड (उमेद) आणि नगरपंचायत देवगड जामसंडे यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड तालुक्यात रानभाज्या विक्री व खाद्य महोत्सव रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कै मो .ज. गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे देवगड येथे आयोजित करण्यात आला आहे. रानभाज्यांचे आहारातील महत्त्व त्यांचे आयुर्वेदिक औषधी गुणधर्म यांची माहिती सर्वसामान्य मिळावी तसेच त्यांची पाककृतीची देखील माहिती व्हावी. आणि या कार्यक्रमातून रानभाज्यांचा वापर वाढवावा. या उद्देशाने रानभाज्या प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे.रानभाज्या विषयी सविस्तर माहिती देण्याकरता संदीप राणे, रानभाजी तज्ञ उपस्थित राहणार आहेत. तरी सदर रानभाजी महोत्सवास देवगड तालुक्यातील जास्तीत जास्त ग्राहकाने प्रदर्शनास भेट देऊन रानभाज्या खरेदी करावी व रानभाज्यांचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन महेश पाटोळे अध्यक्ष शेतकरी सल्ला समिती(आत्मा) आणि कैलास ढेपे तालुका कृषी अधिकारी देवगड यांनी केले आहे
