⚡दोडामार्ग ता.१२-: मोर्ले बागवाडी येथील संगीता अभय मणेरीकर वय 54 वर्षे रा. मोर्ले बागवाडी येथील महीला दोन दिवसांपूर्वी सकाळच्या वेळी ठीक 9.30दरम्यान पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करायला जाते असे सांगून निघून गेली मात्र ती परत आली नाही. त्यामुळे तिचे दिर उदय अंनत मणेरीकर यांनी याबाबतची खबर पोलिस स्टेशनला दिली होती.तिचा मृतदेह आज एका विहिरीत आढळला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे.नेमकी आत्महत्या का केली याचा अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहे.
मोर्ले बागवाडीतील बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला
