वेंगुर्ला प्रतिनिधी – येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आज दुस-या श्रावण सोमवारी वरदशंकरव्रत पूजा बांधण्यात आल्या. यानिमित्त सायंकाळी भाविकांनी आपापल्या पूजेंचे दर्शन घेऊन श्रींच्या चरणी श्रीफळ ठेवले.
श्री रामेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात रामेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने दरवर्षी वदरशंकरव्रत पूजेचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी भाविकांच्या सहकार्याने या पुजेंचे आयोजन करण्यात आले. श्रावण महिन्यातील दुस-या सोमवारी वरदशंकव्रत पूजेंच्या यजमानांनी सायंकाळी पूजेंचे दर्शन घेत देवाकडे साकडे घातले. यानिमित्ताने श्रींच्या गर्भगृहात चंदनाची पूजा बांधण्यात आली. तसेच रात्रौ पालखी प्रदक्षिणाही संपन्न झाली.
