*केंद्र सरकार, भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ घोषणा
*💫सिंधूदुर्गनगरी दि २५-:* अर्णव गोस्वामी विरोधात सिंधूदुर्गनगरीमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसने सोमवारी आंदोलन छेडले. यावेळी अर्णव यांना पाठीशी घालणाऱ्या केंद्र सरकार, भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. अर्णव यांची प्रतिमा यावेळी जाळण्यात आली. जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे व महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनाला प्रदेश सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस महेंद्र सावंत, प्रकाश जैतापकर, दादा परब, अरविंद मोंडकर, बाळू अंधारी, विजय प्रभू, इरशाद शेख, मंदार शिरसाठ, पल्लवी तारी, जेम्स फर्नांडिस, स्मिता वागळे, अमीदी मेस्त्री, चिन्मय बांदेकर, समीर वंजारी, उल्हास शिरसाठ, योगेश्वर क़ुर्ले, महेश परब, हीरोजी परब, प्रदीप मांजरेकर, महेंद्र सांगेलकर, मेघनाथ धुरी, मोहन ओरसकर, नीलेश तेली, महेश तेली, संदेश कोयंडे, फिजा मकाणदार, जैस्मिन लक्ष्मेश्वर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी यानी विविध घोषणा दिल्या. ‘कॉंग्रेस पक्षाचा विजय असो’, ‘भाजप पक्षाचा निषेध असो’, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध असो’, ‘अर्णव गोस्वामी यांचा निषेध असो’ अशा विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी अर्णव यांची प्रतिमा दहन करण्यात आली. ‘अर्णव यांना अटक करा’, अशी जोरदार मागणी करण्यात आली. गोपनीय माहिती अर्णवकडे गेलीच कशी ? यावेळी बोलताना इरशाद शेख यानी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असलेली तसेच देशात गोपनीय राखली जाणारी माहिती अर्णव गोस्वामी यांच्याकडे गेलीच कशी ? असा प्रश्न उपस्थित केला. ही गोपनीय माहिती राष्ट्रपती, पंतप्रधान, सुरक्षा मंत्री, गृह मंत्री व सुरक्षा सल्लागार यांच्याकडे होती. तरीही ती बाहेर गेली. अर्णव आपले चॅनेल मोदी यांच्या घरातून चालते, असे वक्तव्य करीत आहेत. तसेच ते केंद्रीय मंत्री यांच्याबाबत जाहिर बोलून त्यांच्याशी जवळीक असल्याचे दाखवत आहेत. यावरून भाजप देशात फुट पाडत असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र, कॉंग्रेस याला थारा देणार नाही, असे सांगितले.
