*ग्रामस्थानी श्रमदानातून केली रस्त्याची डागडुजी
*💫दोडामार्ग दि.२५ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सोनावल गावचे ग्रामदैवत श्री सातेरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या २६ जानेवारी रोजी होत असून यानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत, तर या जत्रोत्सवाचे औचित्य साधून येथील तरुण व ग्रामस्थानी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची श्रमदानातून डागडुजी केली. यावेळी प्रमोद गवस, सुनील गवस, भूषण गवस, रघुनाथ सोनवलकर, भदी गवस, मनोज गावडे, आनंद केसरकर, लक्ष्मण केसरकर, नंदादीप पंडित, नारायण पंडित, राजा सावंत आदी उपस्थित होते. दोन दिवस मंदिरात कार्यक्रम संपन्न होणार असून आज २५ जानेवारी रोजी सातेरी देवी जन्मोत्सव साजरा करण्यात आला यानिमित्त भजन, महाप्रसाद तसेच विविध कार्यक्रम संपन्न झाले तर उद्या जत्रोत्त्सवानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून गाऱ्हाणी, बोलणी, नवस फेडणे तसेच देवीची खणा नारळाने ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहे तर उशिरा आजागांवकर दशावतार नाट्य मंडळाच्या दशावतार नाट्य प्रयोगाने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे, या जत्रोत्सवास कोरोना विषयी शासनाचे नियम पाळून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
