नगराध्यक्ष संजू परब यांची पत्रकार परिषदेत माहिती*
*💫सावंतवाडी दि २५-:* जिल्हाधिकारी यांनी सावंतवाडीतील “त्या” ९ गाळ्यांवर कारवाई करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. परंतु गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या गाळेधारकांवर आपण नगराध्यक्ष म्हणून उपासमारीची वेळ येऊ देणार नसून, त्यांचे पुनर्वसन केले जाईल अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे
