*_▪️उपोषणकर्ते रवी जाधव यांची प्रकृती ७ दिवसानंतर देखील ठणठणीत;नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती_*
*💫सावंतवाडी दि२५-:* सावंतवाडीत नगरपालिकेच्या समोर रवी जाधव यांचे गेले ७ दिवस सुरू असून, त्या जागेवर आपणाला कायम स्वरुपी व्यवसाय करण्यास जागा द्यावी अशी मागणी केली आहे. परंतु ती जागा न्यायलयाने टिक्री केलेली असून, ती जागा कोणालाही व्यवसायासाठी कायमस्वरूपी देता येऊ शकत नाही. असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी उपोषणकर्ते रवी जाधव यांची डॉक्टरकडे चौकशी केली असून, त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती प्राप्त झाली असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. यावेळी मुख्याधिकारी यांनी तीन वेळा रवी जाधव यांची भेट घेतली असून, नगराध्यक्ष म्हणून परिस्थितीनुसार भेट घेऊन असे देखील ते म्हणाले आहेत.
यावेळी नगरसेवक सुधिर आडीवरेकर;नगरसेवक आनंद नेवगी नगरसेवक नासीर शेख; बंटी पुरोहित,आदी उपस्थित होते.
