आंबोलीतील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था….

असंख्य पर्यटकांनी.वळवला गोव्याकडे मोर्चा;आंबोलीतील हॉटेल व्यवसायावर परिणाम

💫आंबोली दि.१९ विष्णू चव्हाण -: आंबोलीतील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असंख्य पर्यटकांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. त्यामुळे याचा परिणाम आंबोलीतील हॉटेल व्यवसायावर होत आहे.

दरवर्षी लाखोंच्या पटित निधी खर्च करून सुध्दा अंतर्गत रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे.थुपपट्टी लावून मलमपट्टी करून ठेकेदारानी शासनाच्या डोळ्याला पाने पुसली आणि ठेकेदार गेले .हा त्रास पर्यटकांना भोगावा लागत आहे. लॉकडाऊननंतर।पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली आहे.कावळेशेत पाँईट, महादेव गड, हिरण्यकेशी या कडे जाणारे रस्ते सडुन गेले आहेत. कोणत्याही सुविधा येथे नाहीत.

फुलपाखरू उद्यानासाठी लाखोरूपये खर्च केले. आता ते पुन्हा डागडुजीला आले तरीही ते पर्यटकांसाठी खूले करत नाही. मंत्री येतात थंड हवा घेतात. आणि गरम आश्वासन देऊन जातात. अशा या बोगस कामामुळे विकासाला खिळ बसुन भविष्यात आंबोलीला पर्यटनाला मुखावे लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे

You cannot copy content of this page