मठ गाव मर्यादित रांगोळी स्पर्धेचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.२९-: मठ येथील श्री देव स्वयंभू सप्ताहाचे औचित्य साधून माजी उपसरपंच नित्यानंद शेणई पुरस्कृत व श्री छत्रपती शिवाजी मित्रमंडळ आयोजित कै.बाळकृष्ण हरी शेणई व कै. सुरेखा बाळकृष्ण शेणई यांच्या स्मरणार्थ रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

  दि. २ ते ८ ऑगस्ट या कालावधीत मठ स्वयंभू मंदिरात होणारी ही स्पर्धा मठ गावापुरती मर्यादित असून यात इयत्ता दहावीपर्यंतचे विद्यार्थी-विद्यार्थींनी सहभाग घेऊ शकतात. विजेत्यांना रोख १०२२, ७२२, ५२२ व २२२ची दोन अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी प्रशांत नाईक (९४२०२५९११८) किवा संतोष तेंडोलकर (९४०३५५७८३७) यांच्याकडे नावनोंदणी करावी.
You cannot copy content of this page