शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्षपदी दत्तात्रय तवटे तर चेअरमनपदी डॉ. राजश्री साळुंखे

सचिवपदी विजयकुमार वळंजु यांची फेरनिवड

⚡कणकवली ता.२७-; येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियामक मंडळाची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी श्री दत्तात्रय रामचंद्र तवटे यांची तर चेअरमन पदी डॉ. सौ. राजश्री संदीप साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सचिव पदी श्री विजयकुमार जगन्नाथ वळंजु यांची फेरनिवड झाली आहे.
नूतन विश्वस्तामध्ये अनिल लक्ष्मण डेगवेकर, सतीश विजयराव नाईक आणि मंगेश परशुराम कामत यांचा समावेश आहे तर नियामक मंडळाच्या सदस्य पदी डॉ. सविता विष्णू तायशेटे,श्रीकृष्ण राजाराम सापळे, हेमंत सुरेश गोवेकर शिवप्रसाद लिंगप्पा उचले,सुनील माधव नाडकर्णी आणि अनिल शामसुंदर म्हाडगूत यांची निवड झाली आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी रविवार दिनांक २४जुलै २०२२ रोजी येथील विद्यामंदिर हायस्कूल मध्ये पार पडली. या सभेत सर्वानुमते नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी श्री दत्तात्रय तवटे यांची व एकूण अकरा सदस्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
तर काल सोमवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत उर्वरित कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली.
शिक्षण प्रसारक मंडळ हे कोकणातील एक नावाजलेली शिक्षण संस्था असून या संस्थेने नुकतीच सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे गतिमान वाटचाल केली आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कणकवली महाविद्यालय आणि विद्यामंदिर हायस्कूल या दोन शिक्षण संस्था चालविल्या जातात. त्यात विद्यार्थी हजारो शिक्षण घेत आहेत.
दरम्यान शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page