रेवंडीतील नादुरुस्त विजवाहीन्या बदलण्याच्या आम. वैभव नाईकांकडून सूचना

⚡मालवण ता.२६-: रेवंडी येथील बहुतेक विजवाहीन्या या नादुरुस्त तसेच जुन्या झाल्या असल्याने याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधल्यावर आम. वैभव नाईक यांनी विज अधिकार्‍यांना रेवंडीमधील विजवाहीन्या बदलण्याच्या सुचना केल्या आहेत.

रेवंडी मधील वीज वाहिन्या खराब झाल्याने वीज अधुनमधुन खंडित होणायचा प्रकार गेले बरेच दिवस चालू आहे. या वीजवाहीन्या बदलण्यासाठी उपविभागप्रमुख अमोल वस्त, शाखा प्रमुख संजय कांबळी, माजी ग्रा.प.सदस्य भावेश कांबळी तसेच गावातील इतर शिवसैनिक यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मागणी केली होती. आमदार नाईक यांनी त्यांची तात्काळ दखल घेत विज अधिकार्‍यांना विजवाहीन्या बदलण्याच्या सुचना केल्या आहेत. येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष वीजवाहीन्या बदण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन वीज अधिकारी श्री. गायकवाड यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांना दिले आहे.

You cannot copy content of this page