⚡वैभववाडी ता.२६-: धबधब्यावरून कोसळून पाण्याच्या प्रवाहातून मोरीच्या पलीकडे जावून थेट दरीत कोसळल्यामुळे भुईबावडा घाटात एका पर्यटकाचा मृत्यू झाला. रोहन यशवंत चव्हाण (वय २८, रा. कापडपेठ-सांगली) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भुईबावडा येथील धबधब्यावर घडली. त्याला बाहेर काढण्यासाठी सह्याद्री जीवरक्षक व ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून पोलीस प्रयत्न करत आहेत. याबाबतची माहिती वैभववाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रवीण देसाई यांनी दिली.
सांगली येथील काही पर्यटक वर्षा सहलीसाठी भुईबावडा घाटात आले होते. भुईबावडा घाटात वाहणाऱ्या धबधब्यामध्ये ते आंघोळीसाठी उतरले होते. आंघोळ करत असताना यातील एक पर्यटक मोरीतून वाहत जात खाली दरीत पडला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, अभिजीत तावडे, विलास राठोड, श्री पडीलकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. गगनबावडा येथील काही ग्रामस्थ व पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
