गळफास लावून संपविले जीवन;कारण अस्पष्ट
मालवण (प्रतिनिधी)
ओझर व्हरांडा येथील समीर भगवान मुंज (वय ३५) या विवाहित तरुणाचा मृतदेह आज सायंकाळी त्याच्या राहत्या बंगल्यात ओढणीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे याबाबत रात्रौ उशिरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते मात्र पोलीस स्थानकात याबाबत रात्रौ उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती
मिळालेल्या माहितीनुसार ओझर येथील मुंज कुटुंबियांचे कोळंब येथे भुसारी दुकान असून समीर मुंज हे व्यावसायिक होते. समीर मुंज हे सध्या घरी एकटेच राहत होते. आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास समीर मुंज यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या बंगल्यात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत मालवण पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच मुंज यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता.
मात्र, मुंज यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. समीर मुंज यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.
