जिल्हा बँकेचा निर्णय
ओरोस ता.२६-:सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाची शंभर टक्के पूर्ण फेड करणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील सोसायट्यांसह त्या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संस्था कमिटी सदस्य,सचिव यांचा सत्कार करण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. हा सत्कार सन्मान सोहळा बुधवार दि.२७ जुलै २०२२रोजी दुपारी १२:०० वाजता वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालय व डिलक्स हॉल येथे आयोजीत करण्यात आला आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी ,उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी या सन्मान सोहळ्यास बहू संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई या सत्कार सोहळ्यास उपस्थित रहाणार आहेत.या वेळी संस्थांच्या सक्षमीकरणा बाबत चर्चा सत्रही घेणेत येणार आहे.
