जीवनविद्या मिशन कणकवली आयोजित कृतज्ञतादिन महोस्तव
⚡कणकवली ता.२६-: जन्मदाते आई वडीला ,सुष्टी निर्माती चैतन्य शक्ती (परमेश्वर)या सह जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती ,समाज,राष्ट्र ,विश्व या सर्वांच्या योगदानातूनच आपले जिवन सुखकर होत असते त्यामुळे क्षणोक्षणी या सर्वा प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हा आपले जीवन सुखी करण्याचा खरा पासवर्ड आहे असे प्रतिपादन सद्गुरू श्री वामनराव पै याचे शिष्य बन्सीधर राणे यांनी केले.
जीवनविद्या मिशन कणकवली शाखा आयोजित कृतज्ञातादिन महोत्सव मोठया सम्पन्न झाला .सामुदायिक उपासनायज्ञाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर , प्रा हरिभाऊ भिसे,उद्योजक पावसकर ,उद्योजक विलास कराळे ,उद्योजक सुनील पालव, निवृत्त मुख्याध्यापक सी. द. परब, उद्योजक प्रभाकर नारकर प्रा दिनेश राणे ,प्रबोधक संदिप परब ,उद्योजक सागर महाडिक , जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष धनंजय गोडे ,सचिव राजाराम तावडे, खजिनदार योगेश ढवण , जनार्धन चव्हाणआदी मान्यवराच्या हस्ते दीपप्रजवलन ,व प्रतिमा पूजन करण्यात आले, दहावी बारावी विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थाचा यावेळी सन्मान ही करण्यात आला.नगरसेवक सुशांत नाईक,डॉ.विजय पोकळे यांचे हस्ते बन्सीधर राणे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
“कृतज्ञाता हेच पुण्य ” या विषयावर बोलताना पुढे बन्सीधर राणे म्हणाले ,पाप पुण्य च्या भोळसट व बावळट कल्पनाच आपल्याला दुःखाच्या खाईत लोटत आहेत “,इट्स माय लाईफ” ही भावना तरुण पिढीच्या मनात रुजू लागली आहे , आपल्या जीवनात समाज ,राष्ट्र ,प्रत्येक व्यक्तीचे योगदान मोलाचे आहे त्याना वजा करून आपण जगू शकत नाही म्हणून प्रत्येक माणसात,समाजात ,देव पहा राष्ट्र हाच देव आहे म्हणून प्रत्येकाशी कृतज्ञतापूर्वक वागुण परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे हा सुखी होण्याचा राजमार्ग सद्गुरू वामनराव पै यांनी जीवन विद्या या तत्वज्ञानातून सांगितले असल्याचे ते म्हणाले.
सद्गुरु वामनराव पै यांचे मार्गदर्शन समाजाला दिशा देणारे आहे ,जीवन जगण्याची कला शिकविणारे हे तत्वज्ञान प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहचावे म्हणून आयोजि या प्रबोधन म्होस्तवास आपले नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी केले.
संगीत विशारद निलेश कदम,प्रा अंकुश सुतार,सूरज पवार,गणेश चव्हाण,ह.भ.प.संजय साळसकर,संदेश परब आणि सहकाऱ्यांनी नादमदधुर गीते सादर करून सभागृहाला मंत्रमुग्ध केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ,आभार प्रदर्शन सत्यवान आयरे यांनी केले,रुणाली मटकर,ओंकार गुरव या युवकांनी अनुभ कथन केले.मराठे कृषी कॉलेज चे विद्यार्थी ऋग्वेद भेंडवळकर,अमित तळले,सिद्धार्थ खाडेकर,कुणाल पेडणेकर सर्वेश परब याना ही बन्सीधर राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले ,युवा कार्यकर्ते जीवन राणे यांनी सोनचाफ्याचा वृक्ष देऊन प्रबोधकाचा सन्मान केला
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप गावकर,उदय सुर्वे,मारुती गुरव,नाना गोडे,बाळ जठार ,गजानन मठकर आदीनि सहकार्य केले स्फुर्तीगीताने व विश्वप्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला
