⚡कणकवली ता.२६-: कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी ही प्रशाला नवनवीन उपक्रमांसाठी प्रसिध्द आहे. विद्यार्थ्याना परिसरातील भाज्यांची ओळख व्हावी आणि त्यांना आहारातील रानभाज्यांचे महत्त्व समजावे या हेतूने हे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने भरविले होते.
या प्रदर्शनात कुड्याच्या शेंगा, भारंगी, कुरडू, टाकळा, एकपानी, फागल, सातपानी, पेवगा, मुगीण, फोडशी, शेवगा, सुरण, दुदुरली, अळू, अळवड्याचे अळू, घोट्याचे वेल, दिंड्याचे वेल,रान बांबूचे कोंब इ. प्रकारच्या रानभाज्यांचा समावेश होता.
सदर उपक्रमाचे आयोजन सहा.शिक्षक डी. व्ही. सावंत व मकरंद आपटे यांनी प्रशालेचे प्राचार्य सुमंत दळवी व पर्यवेक्षक बयाजी बुराण यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
प्रशालेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला क.ग.शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी प्रत्यक्ष भेट दिली व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. प्रशालेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
