तालुकाप्रमुख बाळू परब यांची माहिती
वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे बुधवारी २७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता तालुक्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यातील दहावी, बारावीतील प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमांक, बारावी – कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील प्रथम तीन क्रमांक असे एकूण ११६ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी दिली.
यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, जिल्हाप्रमुख संजय पडते,ज्येष्ठ नेते संदेश पारकर, पुष्कराज कोले,जिल्हाप्रमुख,
अन्य तालुका पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी झालेल्या बैठकीस उपजिल्हाप्रमुख बाळा दळवी, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, दीपिका गिरप, विनोद राणे, डेलिन डिसोजा, वायंगणी सरपंच सुमन कामत, दिलीप राणे आदी उपस्थित होते.
