विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांची माहिती
देवगड ता.२६-:
देवगड
रत्नागिरी रापम विभाग मार्फत रत्नागिरी पावस नाटे मार्गे पडेल कॅन्टीन जामसंडे मार्गे देवगड या सागरी मार्गावरून सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुटणारी रत्नागिरी कुणकेश्वर ही प्रवासी फेरी गुरुवार दि.२८ जुलै पासून कायमस्वरूपी सुरू करण्यात येत असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी दिली .ही प्रवासी फेरी सुरू करण्याकरीता देवगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भास्कर बर्वे यांनी विशेष प्रयत्न केले होते .
सदर प्रवासी फेरी देवगड बस स्थानकावर १०.३० वाजता पोहोचेल व कुणकेश्वर येथे ११ वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरता सदर फेरी दुपारी २.३० वाजता कुणकेश्वर येथून व देवगड येथून ३.०० वा.पडेल जैतापूर पावस मार्गे रत्नागिरी कडे रवाना होणार आहे तरी या प्रवासी फेरीचा फायदा प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन रत्नागिरी रापम विभाग च्या वतीने करण्यात आले आहे.
