नगरपंचायत हद्दीतील पंतप्रधान आवास योजनेचे काम ठप्प

कामांच्या अहवालाची मनसेच्या चंदन मेस्त्री यांची मागणी

देवगड ता.२६-:
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत सुरू असलेले पंतप्रधान
आवास योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून त्या कामाचा अहवाल तात्काळ देण्यात यावा .अशी मागणी देवगड तालुका मनसे तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी लेखी पत्राद्वारे देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्यधिकारी यांचेकडे केली आहे.


या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे
देवगड जमसांडे नगरपंचायत हद्दीतील गरजू गरीब नागरिकांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुले बांधणीची बांधणीचे प्रकल्प हाती घेण्यात आला होता सदर घरकुल योजना नगरपंचायतीमार्फत राबविण्यात येणार होती. आणि त्याप्रमाणे ग्रामस्थांकडून आगाऊ आवश्यक ते मागणी अर्ज व रक्कम घेतली गेली होती.मागील दोन वर्षांमध्ये हा प्रकल्प ठप्प झाला आहे सद्यस्थितीतही या प्रकल्पाचे काम पूर्णतः ठप्प झाले असून त्यामुळे लाभार्थी हे आपल्या घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत.या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे .यात प्रामुख्याने या प्रकल्प बांधणी करता नेमण्यात आलेल्या मक्तेदार, त्याचप्रमाणे मंजूर असलेली रक्कम, ग्रामस्थांकडून आगावु घेण्यात आलेली रक्कम ,संबंधित मदतीने काम अर्धवट ठेवण्याची कारणे ,ठेकेदाराला आजपर्यंत किती रक्कम देण्यात आली. त्याबाबत सविस्तर माहिती त्याचबरोबर या पंतप्रधान आवास योजनेचा पूर्ण अहवाल व व काम बंद असण्याची कारणे देण्यात यावी हे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे कॉलमच्या स्टील ला पूर्णपणे गंज पकडलेला आहे. त्यामुळे पुढील बांधकाम धोकेदायक होऊ शकते. याबाबत आवश्यक ती कार्यवाहीचा अहवाल तात्काळ देण्यात यावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. आहे. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, सरचिटणीस जगदीश जाधव, शहराध्यक्ष सचिन राणे उपस्थित होते.

You cannot copy content of this page