सुकळवाड भंडारवाडी येथे आढळला आठ फुटी अजगर

सर्पमित्र देवेंद्र पाताडे यांनी पकडून सोडले नैसर्गिक अधिवासात

⚡ओरोस ता.२४-: सुकळवाड ता.मालवण येथील भंडारवाडी येथील रहिवासी संतोष पेडणेकर यांचे घराच्या जवळ शनिवारी रात्री भलामोठा अजगर आढळून आला.अजगर पाहताच घरातील मंडळी भयभीत झाली.त्यांनी शेजारच्या मंडळींना ही कल्पना दिली.त्यानंतर लगेचच सुकळवाड पाताडेवाडी येथील सर्पमित्र देवेंद्र उर्फ बाप्पा पाताडे यांना पाचारण करण्यात आले. देवेंद्र पाताडे यांनी शिताफीने आठ फुटी अजगराला पकडून लगेचच नैसर्गिक अधिवासात सोडले.

देवेंद्र पाताडे यांनी गेल्या महिन्यात तळगाव येथील एका घरातील कोंबड्यांच्या पिंजऱ्यात घुसलेल्या अजगरास पकडले होते.सर्पमित्र म्हणून त्यांनी सुकळवाड पंचक्रोशीत अनेक साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले आहेत याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page