सरपंच अक्रम खान यांच्या हस्ते ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आला शुभारंभ…
बांदा/प्रतिनिधी
बांदा प्रभागातील ० ते ५ वयोगटातील अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या आधारकार्ड नोंदणी शिबिराचा शुभारंभ आज बांदा ग्रामपंचायत सभागृहात सरपंच अक्रम खान यांच्या हस्ते झाला. यावेळी पहिल्या दिवशी ५० हुन अधिक बालकांची आधारकार्ड नोंदणी करण्यात आली.
यावेळी बांदा पोस्ट मास्तर रूपा किनळेकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका सिंधु पवार, दैनिक ‘सकाळ’चे पत्रकार निलेश मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग पोस्ट कार्यालय यांच्या माध्यमातून बाल विकास प्रकल्प अधिकारी सावंतवाडी यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. उद्या २५ रोजी बांदा ग्रामपंचायत कार्यालय, २६ रोजी विलवडे ग्रामपंचायत कार्यालय, २७ रोजी डेगवे, २८ रोजी इन्सुली, २९ रोजी शेर्ले, ३० रोजी मडुरा ग्रामपंचायत कार्यालयात आधारकार्ड नोंदणी शिबीर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात येणार आहे.
. यावेळी अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे, कामिनी कुडव, अर्चना आंबेलकर, देवयानी डेगवेकर, मानसी बांदेकर, किरण गावडे, रतन मोर्ये, चारुशिला परब, क्षमता सातार्डेकर, मदतनीस गितांजली सावंत, संचिता मंजिरकर, अनघा सावंत, मैथिली सावंत, वैष्णवी सातोस्कर, तनुजा देसाई, शुभांगी शिरोडकर, अक्षता सावंत आदी उपस्थित होते.
