नगरपालिकेने ती हटवून रस्ता वाहतुकीस खुला करावा : नागरिकांनी मागणी
⚡सावंतवाडी,ता.२४-: भटवाडी येथील पंचायत समिती कर्मचारी वसाहतीची संरक्षक भिंत गेले काही दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे आज कोसळून रस्त्यावर आली आहे.
भटवाडी परिसरात पंचायत समिती कर्मचारी व अधिकाऱ्यांची कॉलनी आहे. त्या कॉलनीची संरक्षक भिंत आज कोसळल्याने त्याचे दगड रस्त्यावर पसरले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता असल्याने नगरपालिकेने ते हटवून रस्ता वाहतुकीस खुला करावा, अशी तेथील नागरिकांनी मागणी केली आहे
