मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे कवी संमेलन संपन्न

जिथे गाव अन शाळा, तिथे को.म.सा.प उपक्रमांतर्गत आयोजन

⚡सावंतवाडी ता.२४सहदेव राऊळ-: मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव शाळेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेतर्फे “जिथे गाव अन शाळा, तिथे को.म.सा.प या उपक्रमांतर्गत कवी संमेलन पार पडले.

या उपक्रमात सहभागी विद्यार्थी- विद्यार्थीनी कवी-कवियित्री यांनी उत्कृष्ट स्वलिखित कविता, विचारवंताचे लेखन व विचार सादर केले.

लोकमान्य टिळक जयंती दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कवी संमेलनात २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कवी संमेलनावेळी प्रमुख अतिथी जेष्ठ म्हणून साहित्यिक जी. ए. बुवा, कार्यक्रम अध्यक्ष स्थानी मळगांव इंग्लिश स्कूल मळगाव इंग्लिश स्कूलचे स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, कोमसाप जिल्हा सचिव विठ्ठल कदम, जिल्हा शाखा खजिनदार भरत गावडे, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, अटल प्रतिष्ठानचे संस्थापक ऍड. नकुल पार्सेकर, कवी दीपक पटेकर, खजिनदार दीपक तुपकर, सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अड संतोष सावंत, प्रा. रुपेश पाटील, कवियत्री मंगल जोशी- नाईक, मळगांव इंग्लिश स्कूल मळगावच्या मुख्याध्यापिका श्रद्धा सावंत, शिक्षिका प्रज्ञा मातोंडकर, शिक्षिका आर. आर. सावंत भोसले, शिक्षक एस. आर. कारीवडेकर सर, व्ही. आर. सावंत सर, एस. पी. ठाकरे सर, ओ. बी. तिवरेकर सर, एम. बी. फाले सर, ग्रंथपाल सतीश राऊळ, संगणक प्रशिक्षक रितेश राऊळ, पत्रकार सुखदेव राऊळ, प्रयोग शाळा परिचर विलास जाधव, सेवक बाळा जाधव, सेवक आर. एम. भांडे आदी उपस्थित होते.

मळगाव हायस्कूल आणि कोमसाप यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांशी गप्पाटप्पा हा कार्यक्रमही यावेळी पार पडला. विद्यार्थी – वविद्यार्थीनीतर्फे कविता सादरीकरण तसेच आवडीच्या एका पुस्तकाचे वाचन करण्यात आले.यावेळी इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी कविता सादरीकरण व लेख वाचन केले. या मध्ये पूर्वा गावकर हिने “पाऊस”, शांती गावडे हिने “आई”, योगिता मळेवाडकर हिने “फुलपाखरू”, पूर्वा पेडणेकर हिने “मोर”, प्रियांका पाटील हिने “माझी शाळा”, तनिष्का जाधव हिने “पंढरीची वारी”, लक्ष्मण नाईक याने “पाऊस”, वेदिका मठकर हिने “आई”, याज्ञीका साटेलकर हिने “गुरु”, हरिश्चंद्र बाईत याने “पाऊस”, नरेश गावडे याने “माझी आई “, समृद्धी चाळके हिने “चहाचे भांडण”, आर्या राणे हिने “पाऊस”, मोहिनी राऊळ हिने “मैत्री”, आदिती राणे हिने ” आई आणि मी”, श्रावणी बुगडे ि “जत्रा”, दिव्यानी निरावडेकर हिने “पाखरु”, भाग्यश्री बाईत हिने “मालवणी”, तनिष्का राऊळ हिने “मालवणी” या कविता सादर केल्या. तर निधी राऊळ हिने पुस्तक परीक्षण, सुचित्रा धुरी हिने पुस्तक परीक्षण व पूजा कोळेकर हिने अभिवाचन सादर केले.

You cannot copy content of this page