⚡आंबोली, ता.२४-: गणेश चतुर्थी सन जवळ येत आहे तशी मूर्ती शाळा मध्ये लगबग वाढली आहे.२९ पासून श्रावण सुरू होत आहे.चातुर्मासात आता सणांचे वेध लागले आहेत.त्यादृष्टीने नियोजन सुरू होते.
पावसाळ्यात सगळ्यात मोठा सण म्हणजे चतुर्थी.सध्या गणपती ची देखणी सुंदर वेगवेगळ्या आसनावरती बसलेली मूर्ती सांगण्यासाठी आणि त्यासाठी पाठ देण्यासाठी मूर्ती शाळेत ये जा असते.मूर्ती करांची देखील लगबग वाढली आहे.रात्री जागू लागल्या आहेत.आंबोलीत ही मेस्त्री यांच्या मूर्ती शाळेत ही लगबग वाढली आहे.इथे पावसाळ्यात जास्त पाऊस,धुके,बाष्पयुक्त दमट हवा वातावरणामुळे मातीच्या मूर्ती सुकण्याची कसरत करावी लागते.यासाठी आग पेटवून शेकोटी ने मूर्ती सुकवाव्या लागत आहेत असे मूर्तिकार प्रसाद मेस्त्री म्हणाले.लहान मुलांना गणपती हा आकर्षणाचा विषय असतो.
