देवगड
देवगड आगाराला आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेमधून १२,५६३ किमी च्या ७७ फेऱ्यांद्वारे रु ५ लाख ६० हजार ९४०/-एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
१०जुलै ते १४ जुलै या कालावधीत आषाढि एकादशी पंढरपूर यात्रा कालावधीत देवगड आगाराने ईपीकेएम ४४.७० आणि एल एफ ७१.९५ राखीत ८गाड्यामधून हे उत्पन्न मिळविले आहे .
या कालावधीत देवगड आगारच्या चालक वाहकांनी, जळगाव रावेर,औरंगाबाद ,बीड,जालना,
लातुर,नांदेड या मार्गावर सुरक्षित प्रवासी सेवा दिली .प्रामुख्याने पंढरपूर जळगाव रावेर या ५१५ किमी या सर्वाधिक लांबीच्या मार्गावर चालक एस.आर.पाटील,वाहक एस.पी.सोनवले, यांनी विशेष सेवा देऊन देवगड आगाराचे चालक जी. जी. मुंगशे वाहक के.पी.बारगजे यांनी सर्वाधिक १लाख १५ हजार एवढे उत्पन्न आणले .याव्यतिरिक्त चालक एस.जी.कुंभार,वाहक एस.जी. खोत,चालक पी.डी. जुनगरे, वाहक डी. एम.केंद्रे,चालक ए.एस.वाळवेकर,वाहक ए.पी.धुमाळ,चालक टी. बी.मुंढे,वाहक एल.बी .नागरगोजे ,चालक जे.यु .खैरनार वाहक एस.एन.कुवर,चालक आर.के.मुंढे,वाहक एस.एन.फाळके या चालक वाहकांनी प्रवाशांना सुरक्षित सेवा दिली.या आषाढी एकादशी यात्रा उत्सवात देवगड आगाराचे सदाहसतमुख अभ्यासू वाहतूक नियंत्रक योगेश देशमुख यांनी देवगड आगाराच्या बरोबर कुडाळ आगाराच्या पंढरपूर येथून अतिशय उत्तमप्रकारे यशस्वी नियोजन केले.सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक,विभागीय कार्यालय,देवगड आगार व्यवस्थापक,श्रीकांत सैतवडेकर स्थानक प्रमुख लवू सरवदे यांचे मार्गदर्शनाखाली यात्रौत्सव प्रवासी सेवा पार पडली.
