⚡देवगड ता.२३-: फणसगाव मधील दोन मंदीरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडून रक्कम चोरून नेल्याची घटना दि. २२ जूलै रोजी रात्री घडली.दोन्ही मंदीराच्या दानपेट्या पैसे काढून मंदीराच्याच बाजुला टाकून दिल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फणसगांव गावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदीर व विठ्ठल मंदीर या दोन मंदीरातील दानपेट्या फोडून पैसे चोरून नेल्याचे शनिवारी सकाळी मंदीरात पुजा करण्यासाठी गेलेले पुजारी प्रविण गुरव व चंद्रकांत आडीवरेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी गावातील मानकरी मंडळींना दिल्यानंतर विजयदूर्ग पोलिस स्टेशन पाटगांव दुरक्षेत्राचे हेड.कॉ.तांबे यांना कळविण्यात आली.
चोरीच्या घटनेबाबत समजल्यानंतर विजयदूर्ग पोलिस स्टेशनचे स.पो.निरिक्षक बी.बी.फार्णे, पोलिस उपनिरिक्षक भालेराव, पो.हे.कॉ.दिपेश तांबे आदींनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.यावेळी सरपंच सायली कोकाटे, उपसरपंच उदय पाटील, मंगेश पाटील, माजी पं.स.सदस्य सुभाष कोकाटे, गाव समितीचे मनोहर गुरव, संतोष केसरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरिक्षक भालेराव तपास करीतआहेत.
