स्ट्रीटलाईटच्या पोलखाली मध्यरात्री बिबट्याचे दर्शन

भिरवंडे येथील प्रकार;वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी

⚡कणकवली ता.२३-: भर वस्तीत स्ट्रीटलाईटच्या पोल खाली मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने भिरवंडे बिवनेवाडी येथे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.

कणकवली तालुक्यातील भिरवंडे बिवनेवाडी बस्ताडकर टेम्ब येथे विल्सन डिसोझा व डेव्हिड डिसोझा यांच्या घरासमोरील अंगणात स्ट्रीटलाईटच्या पोल खाली मध्यरात्री बिबट्याचे दर्शन झाले आहे. कुत्र्याच्या शोधात हा बिबट्या आला होता. परंतु पाळीव कुत्रा पिंजाऱ्यात बंद असल्याने त्याला कुत्र्याला पकडता आले नाही. चाहूल लागल्याने कुत्रा जोरजोरात भुंकत होता म्हणून घराच्या बाहेर आल्यावर घरा समोरील स्ट्रीट लाईटच्या पोला खाली बिबट्याचे दर्शन झाले. यापूर्वीही बिबट्याने भिरवंडे खलांतर येथील शेतकऱ्यावर भर दुपारी हल्ला करून जखमी केले होते. याबाबत वनविभागाशी संपर्क साधण्यात आला आहे. बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page