सावंतवाडी,ता.२१: सांगेली सावंतटेंब येथील एक तरुण गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. दित्यानंद विष्णू राऊळ (४५) असे त्या तरुणाचे नाव आहे
. १७ जुलै रोजी घरात कोणाला काही न सांगता निघून गेला मात्र अद्याप पर्यंत माघारी परतला नाही. या दरम्यान त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र तो कोठेही न सापडल्याने त्याच्या नातेवाईकांनी आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.
