आप्पा लुडबे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.१९-: मालवणचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे व एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्यातून वायरी येथील लोकनेते आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे मंगळवारी आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मालवण मधील ज्येष्ठ डॉक्टर सुभाष दिघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, प्रभाकर लुडबे, नारायण लुडबे, भाई लुडबे, संतोष लुडबे, आप्पा चव्हाण, गणपत लुडबे, हेमंत मिठबावकर, दिलीप तळगावकर, दीपक कुडाळकर, रूपा सुतार, पपो लुडबे यासह अन्य सहकारी उपस्थित होते.

आरोग्य तपासणी शिबिरात हृदयरोग, युरोलॉजी, जनरल सर्जरी, कर्करोग तपासणी, प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग, नेत्र तपासणी, अस्तिरोग, नेफ्रोलॉजी, दंतरोग आदी आरोग्य सेवा व ईसीजी, बिएसएल, बोन डिसीज यासाठी ब्लडप्रेशर, शुगर आदी तपासणी करण्यात आल्या. डॉ. स्नेहा पाटील, डॉ. स्नेहा बेलारे, डॉ. संजय जोशी, डॉ. सुमन बिस्ट, परिचारिका प्रणया वळंजू, निकिता शेटये यासह विकास लुडबे, रितेश घाडीगांवकर, विजू गोसावी, सुरज खरात आदी आरोग्य तपासणी पथकात उपस्थित होते.

या शिबीरात डोळ्याचे ऑपरेशन करण्याची आवश्यकता असलेले १७ जण तर इतर ऑपरेशन करण्याची आवश्यकता असलेले १२ जण रुग्ण समोर आले असून लवकरच त्यांच्यावर त्यांना एसएसपीएम हाॅस्पिटल येथे नेऊन ऑपरेशन करण्यात येणार आहे, अशी माहिती आप्पा लुडबे यांनी दिली.

You cannot copy content of this page