अधीक्षक अभियंता यांच्याकडे खासदार विनायक राऊत यांची मागणी
आंबोली,ता.१५: वर्षा पर्यटन साठी आंबोलीत पर्यटक आणि व्यावसायिक आणि लोकांची विजेअभावी मोठी गैरसोय होत आहे.त्यामुळे याठिकाणी तत्काळ लक्ष घालून वायरमन ची संख्या वाढवा ,वीज खांब बदला,ट्रान्सफॉर्मर बदला आणि चौकुळ,आंबोली,कुंभवडे येथील वीज सुरळीत करा.लोकांच्या अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत याची तातडीने कार्यवाही करा अशी मागणी अधीक्षक अभियंता यांच्याकडे खासदार राऊत यांनी केली आहे
