Headlines

दहावी परीक्षेत तालुक्यात प्रथम, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

कै सुशिलावाई मेघश्याम शिरोडकर स्मृती पारितोषिके सन्मान

⚡सावंतवाडी ता.१५-:
कै. सुशीला बाई मेघश्याम शिरोडकर स्मृती पारितोषक वितरण कार्यक्रम राणी पार्वती देवी हायस्कूलमध्ये प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच सुशीलाबाईंच्या कन्या उमा मुंठेकर आणि निळकंठ मुंठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.
सावंतवाडी केंद्रातून दहावीच्या परीक्षेत प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कै. सुशीला बाई मेघश्याम शिरोडकर स्मृती पारितोषक देऊन गौरवण्यात येते. हे पारितोषक शिरोडकर कुटुंबीयांनी 2020 सालापासून दरवर्षी देण्याचे ठरविले आहे.

कै.सुशीला बाई शिरोडकर या उच्चशिक्षित गृहिणी सावंतवाडीत अनेक वर्षे वास्तव्यास होत्या. सावंतवाडीतून मागिल शंभर वर्षै प्रसिद्ध होणाऱ्या “वैनतेय”चे संस्थापक संपादक कै. मेघश्याम शिरोडकर यांच्या पत्नी सुशीला बाई यांचा वैनतेच्या उभारणीत तसेच त्या काळच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कार्यात नेहमीच सहभाग होता. इंग्रजी, मराठी आणि संस्कृत या विषयात त्यांना विशेष रस होता. अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी त्याचा नेहमीच प्रयत्न असे. स्वत: च्या कुटुंबाची पदरमोड करून अनेक विद्यार्थ्यांना त्या शिक्षण घेण्यास मदत करत असत.

यावर्षीची पारितोषिके राणी पार्वती देवी हायस्कूलची विद्यार्थिनी कु.वरदा तानाजी सावंत आणि शांतीनिकेतन शाळेची कु.तेजल उषा पवार यांना प्रथम क्रमांकासाठी विभागून देण्यात आली. प्रत्येकी रुपये 9000/-, तसेच स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

You cannot copy content of this page