⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी माठेवाडा येथील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या तीन ते पाच वर्षाच्या बच्चे कंपनीने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रखुमाई साकार केली जणू या अंगणवाडीमध्ये
पांडुरंगासोबत पंढरी अवतरली होती
आज रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीच्या पांडुरंग आणि रखुमाई सह वारकऱ्यांची पालखी,दिंडी पताका, या बच्चे कंपनीने साकारली त्याचबरोबर संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांच्या वेशभूषा ही या बच्चे कंपनीने साकारल्या त्यामुळे या अंगणवाडीत पंढरीची शोभा अवतरली यावेळी कीर्तन भजन आधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या बच्चे कंपनीला रविवार असतानाही पांडुरंग आणि रखुमाईची प्रतिकृती साकार करण्याकरिता अगदी सकाळी ही बच्चे कंपनी दाखल झाली होती यामध्ये या बच्चे कंपनीच्या पालकांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
तर अंगणवाडी सेविका सौ अनुराधा पवार,मदतनीस सौ अमिषा सासोलकर,
यांच्या सह पालक सहभागी झाले होते यात रखुमाईची वेशभूषा नूतन पोकळे हिने साकारली व साक्षात विठ्ठलाच्या वेषभूषेत श्री स्वप्निल नेवगी हा होता.
