कनेडी बाजारपेठ येथे किर्तन पांडुरंगाचे कार्यक्रम संपन्न

संदेश प्रतिष्ठानचे आयोजन;जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत यांनी मानले आभार

⚡कणकवली ता.१०-: आषाढी एकादशीच्या निमित्ताने संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे यांच्या वतीने कनेडी बाजारपेठ येथे एक दिवस वारकऱ्यांसाठी या संकल्पनेतून कीर्तन पांडुरंगाचे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ह. भ. प श्री प्रसाद व्यास, पुणे व ह. भ. प. सौ उज्वला ताई वेद पाठक, पुणे यांची सुश्राव्य कीर्तने सादर झाली. तसेच पांडुरंगाची दिंडी काढण्यात आली. यामध्ये लहान मुलांनी सादर केलेले चित्र देखावे पाहण्यासारखे होते. तर येथील स्थानिक वारकऱ्यांनी हरिपाठ सादर केला.

या सर्व कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात नाहून गेला होता. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत दाखवली होती.

यावेळी हा कार्यक्रम आयोजित केल्याने सर्व भक्तांनी गोट्या सावंत आणि संजना सावंत यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page