रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे आयोजन;आषाढी एकादशीचे निमित्त
⚡वैभववाडी ता.१० संजय शेळके-: रोटरी क्लब ऑफ वैभववडीच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त नाधवडे येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते रमेश ईश्वरकर यांच्या हस्ते व उद्योजक हनुमंत नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडले.
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या शिबिराचा लाभ घेतला या प्रसंगी नाधवडे सरपंच सौ. नारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, माजी सभापती बापी मांजरेकर, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, प्रवीण कुडतरकर, प्रल्हाद कुडतरकर, किशोर कुडतरकर, बाळू कांबळे, महेश गोखले, परशुराम इस्वलकर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थितांनी रोटरी क्लब वैभववाडीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी 67 वारकऱ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे प्रेसिडेंट संतोष टक्के, सेक्रेटरी संजय रावराणे, ट्रेझर प्रशांत गुळेकर, सदस्य श्री सचिन रावराणे , गंगाधर केळकर, मुकुंद रावराणे, शरद नारकर, स्नेहल रावराणे, विद्याधर सावंत, हे रोटरी परिवारातील सदस्य उपस्थित होते. नेत्र तपासणी वेळी डोळ्यातील मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे अशा नागरिकांवर रोटरी क्लब वैभववाडीच्या वतीने मोफत उपचार करण्यात येणार आहेत. रावराणे आय केअर चे श्री अभयासिंह रावराणे यांनी नेत्र तपासणी करण्यासाठी मदत केल्या बद्धल,व नाधवडे येथे कॅम्प आयोजित करण्यासाठी सहकार्य केल्याबद्धल सेक्रेटरी संजय रावराणे यांनी आभार मानले.
