जे आमदार केसरकरांचे नाही झाले ते जनतेचे काय होणार…?

*माजी नगराध्यक्ष बदनामी वेळीच थांबवा, अन्यथा पोलखोल करणार

*शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा पत्रकार परिषदेत इशारा*

*💫सावंतवाडी दि.२१-:* सावंतवाडी शहराच्या विकासात खोडा घालून विद्यमान नगराध्यक्ष संजू परब यांना बदनाम करण्याचा डाव माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मांडला असून, ते वारंवार आपले अज्ञात प्रकट करत असल्याचा आरोप भाजप शहरध्यक्ष अजय गोंदावळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी ते म्हणाले की, बबन साळगावकर हे प्रामुख्याने सावंतवाडी शहराची बदनामी करत असून कोरोना काळात त्यांचे योगदान काय…? ते कुठे लपून बसले होते…? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच नगराध्यक्ष संजू परब शहराचा विकास करत असल्यानेच माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर बदनामी करत असून त्यांनी वेळीच ही बदनामी करणे थांबवावी अन्यथा बबन साळगावकर यांच्या नगराध्यक्ष कार्यकाळातील सर्व खुलासे बाहेर काढू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच ज्यांना आमदार दिपक केसरकर यांनी मोठे केले त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसणारे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर जे केसरकरांचे नाही झाले ते सावंतवाडीचे काय होणार..? असा जोरदार टोला देखील भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी लगावला आहे. यावेळी निशांत तोरस्कर बंटी पुरोहित,अमित परब,केतन आजगावकर, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page