*उपचारादरम्यान गोवा बांबोळी येथे निधन
*💫सावंतवाडी दि.२१-:* माडखोल धवडकी येथील अपघातात २९ डिसेंबर रोजी गंभीर जखमी झालेले ठेकेदार राजू राणे यांचे गुरुवारी सकाळी गोवा बांबोळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. गेले तेवीस दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अखेर निष्फळ ठरली. निधनाचे वृत्त समजताच माडखोलसह सावंतवाडीत परिसरात शोककळा पसरली. सेवाभावी आणि परोपकारी वृत्तीच्या तसेच शांत व मनमिळावू स्वभावाच्या राजू राणेंच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. व्यवसायाने ठेकेदार असलेले राजू राणे हे मूळ माडखोल येथील असून ते सावंतवाडीत सर्वोदयनगर येथे वास्तव्यास होते, सेवानिवृत्त सावंतवाडी एसटी आगाराचे निवृत्त अधिकारी आनंद राणे, सावंतवाडी तालुका केमिस्ट असोसिएशनचे सचिव संतोष राणे तसेच संजय राणे यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, आई, तीन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
