सजा बांदा तलाठीची नाहक बदनामी खपवून घेणार नाही

*सजा बांदा ग्रामस्थांचा निवेदनाद्वारे तहसीलदार याना इशारा*

*💫सावंतवाडी दि.२१-: सजा बांदा च्या तलाठी सौ. वर्षा नाडकर्णी यांनी भ्रष्टाचार केला असा खोटा आरोप करून काही लोकपेपर बाजी करून बदनामी करत असून, प्रशासनाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या अखत्यारीत बांदा येथील चार मोठी गावे असून कुठेच भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत नसून, त्यांच्यावर भ्रष्टाचार करण्याचा खोटा आरोप करून त्यांची बदनामी केली जात आहे. अशा प्रकारे बदनामी करणार्‍यांना सजा बांदा गावातील लोक खववून घेणार नाहीत. तसेच संबधित लोकांनी प्रशासनावर दबाव टाकून त्यांची बदली करण्याचा प्रयत्न केल्यास सजा बांदा पंचक्रोशीतील लोक गप्प बसणार नाहीत. प्रसंगी आंदोलन, उपोषणाचा मार्ग अवलंबतील असा इशारा निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. यावेळी सरपंच अक्रम खान,सभापती मानसी धुरी, मकरंद तोरसकर, उन्नत्ती धुरी, प्रमोद कामत, श्यामसुंदर मांजरेकर आदी सजा बांदा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page