⚡मालवण ता.१०-: भारत सरकारच्या नवोदय विद्यालय समिती या संस्थेमार्फत एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेमध्ये ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेत इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेतलेली, कांदळगाव परबवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ ची विद्यार्थिनी कुमारी कोमल पांडुरंग राणे हिने यश संपादन करून जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी ती पात्र ठरली आहे.
कोमल राणे हिला कांदळगाव परबवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ च्या शिक्षिका तथा आई पल्लवी राणे आणि ओझर विद्यामंदिरचे शिक्षक तथा वडील पांडुरंग राणे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल तिचे ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
