कणकवलीत उड्डाण पुलावरील सिमेंटच्या बॅरिकेट्सला दुचाकीची धडक;दोघांचा मृत्यू

⚡कणकवली ता.०७-: मुंबई गोवा महामार्गावरील तळेरेहून कणकवलीला दुचाकीने येत असताना उड्डाण पुलावर असलेल्या सिमेंटच्या बॅरिकेट्सला दुचाकीची धडक बसून दुचाकीवरील अमरेश विठ्ठल तेंडोलकर ( ४५ , कणकवली – कांबळेगल्ली ) व विराज विजय चौकेकर ( २ ९ , चौके , मालवण ) हे दोघे मृत्यूमुखी पडले . हा अपघात कणकवली येथील एस हायस्कूलनजीक बुधवारी रात्री १२ वा . सुमारास घडला .

अपघाताची माहिती समजल्यानंतर कणकवलीतील पोलीस तसेच काही नागरिक घटनास्थळी दाखल झाले . दुचाकीवरील विराज
चौकेकर यांचा जागीच मृत्यू झाला होता . तर अमरेश तेंडोलकर यांचा ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविताना मृत्यू झाला . अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले . मयत अमरेश यांचे भाऊ जगदिश विठ्ठल तेंडोलकर ( ४९ , कणकवली – कांबळेगल्ली ) यांच्या फिर्यादीनुसार अपघाताची कणकवली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .

You cannot copy content of this page