आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे प्रतिपादन
वैभववाडी संजय शेळके
शेतकऱ्यांनी शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जरूर करावा मात्र पारंपारिकपणे सुरू असलेल्या पशुपालनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अधिकारी बरोबरच पदाधिकारी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी शेतीत आवड असलेले प्रमुख शेतकरी अशा सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.तरच भविष्यात शेतीला चांगले दिवस येतील असे मत कृषी दिन कार्यक्रमानिमित्त आत्मा समिती अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले आहे.
वैभववाडी पंचायत समिती सभागृहामध्ये पंचायत समिती वैभववाडी कृषी विभाग व आत्मा समिती वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. भोई, पंचायत समिती कृषी अधिकारी शशिकांत भरसट, कृषी विस्तार अधिकारी श्री जाधव, गटशिक्षणाधिकारी श्री शिनगारे आदी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री फुटणकर यांनी आंबा काजू पीक संरक्षण यावर शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली.
प्रगतशील शेतकरी मंगेश कदम यांनी भात पिकातूनही शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळू शकतो मात्र यासाठी या पिकाकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे आपल्या शेतात नेमके कोणते भात पिकासाठी उपयुक्त अन्नपदार्थ आहेत हे पाहण्याची गरज आहे आधुनिक तंत्रज्ञान वापरून भात शेती केल्यास चांगले उत्पादन येऊ शकते हे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. मात्र भात खरेदीची असलेली 40 किलो प्रति गुंठा ही अट शासनाने रद्द करावी आपल्या शेतातही प्रतिगुंटा 60 ते 80 किलो च्या वरती भात पिकत असते त्यामुळे उर्वरित भाताची भात पिकवून करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचे जादा असलेले भात पडून असल्याने शेतकऱ्यांचा मोठा तोटा झालेला आहे हा जाचक नियम शासनाने बदलावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री महेश संसार यांनी देशी गोपालन व गोपालनाचे शेतीतील महत्त्व यावर शेतकऱ्यांना विस्तृत माहिती दिली. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री विलास देसाई व श्री महेश गोखले यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
गटविकास अधिकारी श्री जयप्रकाश परब यांनी शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व शेतकरी जगला तरच जग जगेल या सर्वांनीच एकत्रित काम करण्याची गरज आहे व सर्वांनी एकत्र येऊया यासाठी आवाहन केले यावेळी प्रगतशील शेतकरी श्री महेश संसारे आणि श्री राजेश तावडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये वैभववाडी तालुका कृषी कार्यालयात सेवा बजावत असताना निधन पावलेले कृषी विस्तार अधिकारी काय विवेकानंद नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे तालुक्यातील शेती वृद्धिंगत होण्यासाठी असलेले योगदान याची आठवण काढण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंचायत समिती परिसरामध्ये फळझाडांची लागवड करून कृषी दिन साजरा केला कृषी दिनाला शेतकऱ्यांची उपस्थिती कमी असल्याने सर्वच व्यक्तींनी यावेळी खंत व्यक्त केली.
फोटो वृक्षारोपण करताना गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,आत्मा अध्यक्ष जयेंद्र रावराणे, विस्तार अधिकारी लक्ष्मण हाडे,शिणगारे, उपस्थित छाया संजय शेळके वैभववाडी
