बांदा निमजगा शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मुंबई येथील कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचा पुढाकार;श्वेता कोरगांवकर, बाळा आकेरकर यांची उपस्थिती

बांदा/प्रतिनिधी
कोकण कला व शिक्षण विकास संस्था मुंबई या संस्थेच्या माध्यमातून बांदा-निमजगा येथील जि. प. प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, प्रियांका नाईक, बूथ अध्यक्ष रत्नाकर आगलावे, युवा अध्यक्ष साई सावंत, प्रशालेचे शिक्षक उपस्थित होते. संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीट मिळावे यासाठी बाळा आकेरकर यांनी प्रयत्न केले होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल कोकण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे यावेळी आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page