घेतलेल्या पैशांचा आकडा त्यांनी जाहीर करावा;शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर
⚡सावंतवाडी ता.०२-: आमदार दिपक केसरकरांना मंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत त्यामुळेच ते शिवसेना नेत्यांवर टीका करीत आहेत. मात्र केसरकर जनतेच्या मनातून उतरले असून बंडखोरीसाठी घेतलेल्या पैशाचा जो आकडा जनतेत फिरत आहे त्याचा केसरकरांनी खुलासा करावा असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते डॉ.जयेद्र परूळेकर यांनी आज येथे लगावला.
तर आठ वर्षापुर्वी शिवसेनेत आलेले केसरकर हिंदूत्व आणि बाळासाहेबांचे नाव घेऊन एकनिष्ठता सांगत असतील तर काँग्रेसमध्ये असतांना ही हिंदूत्व आणि एकनिष्ठता कुठे होती.
श्री परुळेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत श्री केसरकर याच्यावर टिका केली,
