⚡वेंगुर्ला ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारणीवर उपाध्यक्षपदी वेंगुर्ला येथील पत्रकार दाजी नाईक यांची व सदस्यपदी दिपेश परब याची बिनविरोध निवड झाल्याबद्दल वेंगुर्ला भाजपाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, वेंगुर्ला पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, उपाध्यक्ष के.जी.गावडे, माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, माजी उपसभापती स्मिता दामले, माजी नगरसेवक श्रेया मयेकर, कृपा गिरप-मोंडकर, वृंदा गवंडळकर, रसिका मठकर, आकांक्षा परब, मच्छिमार नेते दादा केळुसकर, मनवेल फर्नांडिस, संजय पुनाळेकर, साईप्रसाद नाईक, प्रशांत आपटे, अशोक कोलगांवकर, रवी शिरसाट, शेखर काणेकर, भुषण सारंग आदींसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व पत्रकार संघाचे उपस्थित होते.
