“एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत”,

उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

⚡मुंबई : “एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मागच्या 11 दिवसांपासून एकनाथ शिंदे “आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आमचा गट हीच शिवसेना आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही झगडतोय”, असं त्यांनी वारंवार सांगितलं. पण आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.शिवसेनेला वगळून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

शिवसेनेला वगळून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. याशिवाय माझ्याशी असलेलं वैर मुंबईवर थोपवू नका, असं म्हणत मेट्रो कारशेड हलवू नका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

You cannot copy content of this page