या संस्थांनी घेतला पुढाकार
⚡सावंतवाडी ता.२९-: माध्यमिक विध्यालय डेगवे प्रशालेत श्री स्थापेश्वर महालक्ष्मी ट्रस्ट डेगवे व सरस्वती चुडे प्रतिष्ठान डेगवे यांवांच्यामार्फत दहावी, बारावी परीक्षा २०२२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व हायस्कूलमधील नवीन विदयार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी पं.स. सभापती भगवानराव देसाई यांनी भूषविले. यावेळी एसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी शलाका आईर, वैभव देसाई, पूर्वा गवस, प्राची देसाई, प्रज्ञा मांजरेकर, वेदना खरवत, पार्थ देसाई, यश डेगवेकर यांचा सत्कार कण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात आली.
तसेच बारावी परीक्षेतील प्राची देसाई, शंकर सुतार, समीक्षा देसाई, अर्पिता सावंत, संजना देसाई, सुजाता देसाई यांचाही सत्कार करून त्यांना रोख पारितोषिक देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी गुणवंत होऊन डेगवे गावाचे दिग्विजय नाव सार्थ ठरवावे, असे प्रतिपादन सरस्वती चुडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी केले.
कार्यक्रमाला माजी पं. स. सभापती भगवानराव देसाई, देवस्थान कमिटीचे सचिव बाबली देसाई, सदस्य मधुकर देसाई, उत्तम देसाई, सुभाष देसाई तसेच सरस्वती चुडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, वासंती देसाई, उपसरपंच प्रवीण बाबाजी देसाई, श्रीराम देसाई, मधुकर देसाई, डेगवे, मोरगाव, आडाळी, पडवे माजगाव येथील पालक, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सावंत मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. देवस्थान कमिटीमार्फत सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले.
