सायली दुभाषी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा

जिल्हाध्यक्ष रेवती राणे यांनी केली नियुक्ती;अर्चना घारे परब यांनी दिले नियुक्ती पत्र

⚡सावंतवाडी ता.३०-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हाध्यक्ष ॲड. सौ. रेवती राणे यांनी सावंतवाडी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदी एड. सौ. सायली काशिनाथ दुभाषी यांची निवड केली. त्याचे नियुक्तीपत्र कोकण विभाग महिला अध्यक्ष मा. सौ. अर्चना घरे-परब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक मा. सौ. पूजा निकम रत्नागिरी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक मा. सौ. दर्शना बाबर देसाई महिला जिल्हाध्यक्ष ॲड. सौ. रेवती राणे, संगमेश्वर महिला तालुकाध्यक्ष सौ. दुर्वा वेल्हाळ माजी नगरसेविका अफरोज, राजगुर युवती जिल्हाध्यक्ष सो. सावली पाटकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, सौ. सिद्धी निंबाळकर, सौ. प्रांजल राऊळ, सौ. मृणाल मसुरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page